
नांदगाव(मुक्ताराम बागुल):- नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव पंचायत समिती स्तरावरून घरकुल लाभार्थी यांची जागेची तसेच घरकुल आवश्यक आहे किंवा कसे यांची पाहणी न करता पक्के घर व पात्र नसणाऱ्या लाभार्थी हप्ते वितरित होत असल्याचे चित्र समोर आले असून संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी रोहिले बुद्रुक येथून होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव नांदगाव तालुक्यातील गावात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरजू पात्र, बेघर, अपंग, विधवा लाभार्थी की ज्यांना आज रोजी घरकुलाची आवश्यकता आहे असे लाभार्थींना घरकुलाचा लाभ न देता मंजूर लाभार्थी यांचे घरकुल नेमक्या कोणत्या जागेवर मंजूर झाले आहे. त्या जागेवर आज रोजी कशी घर आहे की पक्के घर याबाबतची कुठलीही नांदगाव पंचायत समिती मधील घरकुल विभागाचे कर्मचारी/ अधिकारी न करता जास्त पणे पक्के घर व बांधकाम सुरू नसताना देखील हप्ते वितरित करीत आहेत. घरकुल अनुदान वाटप बाबत माहिती मागितली असता ग्रामपंचायत तसेच नांदगाव पंचायत समिती मधील घरकुल विभागाची ऑपरेटर माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने नांदगाव पंचायत समितीला दिलेल्या घरकुल अपात्र लाभार्थ्यांच्या यादी मध्ये काही लाभार्थी पात्र नसतांनाही अपात्र लाभार्थींची नावे व आहेत.तर नांदगाव पंचायत समितीकडे अपात्र गावातील यादी दिलेली असताना देखील घरकुल विभागाचे ऑपरेटर यांनी अपात्र घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर हप्ते वितरित केल्याचा प्रकार घडला असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नांदगाव पंचायत समिती व रोहिले बुद्रुक येथे स्थानिक चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची घरकुले रद्द करण्यात यावे. रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे खोटी व चुकीची माहिती देणाऱ्या दोषी असलेल्या वर आणि नांदगाव पंचायत समितीचे दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रोहिले बुद्रुक येथुन होत असून लवकरच संबंधित विभागाकडे याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
