
सोनांबे (प्रतिनिधी) सोनांबे जनता विद्यालयातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती साठी पाच तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती साठी एक विद्यार्थी पात्र ठरला आहेविद्यालयातील इयत्ता पाचवीत शिकणारी जोंधळे स्नेहा दिनकर १९२ गुण, शहाणे प्रणव संजय १८८ गुण,गुरव श्रेयस नितीन १८० गुण,सांगळे मानसी बाळासाहेब १६२ गुण ,शिंदे साहिल सुभाष १५० गुण मिळवून पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत या विद्यार्थ्यांना श्रीमती योगिता शिंदे,भाऊसाहेब दहिफळे,रोहिणी पवार,शांताराम चांदोरे,सोपान पवार यांचे मार्गदर्शन लाभले.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पवार प्रणिता विकास १६२ गुण मिळवून पात्र ठरली आहे.तिला शबानाबी कादरी,दिपाली घोटेकर,वर्षा मोरे,पंडित चीने,सोपान पवार,किरण पवार यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पालक नारायण शिंदे,संजय शहाणे,सुभाष शिंदे,विकास पवार ,दिनकर जोंधळे यांच्यासह दीपक पगारे,ज्योती पाटील, जनाबाई सूडके, नवनाथ माळी,मिलिंद पाटील,भारती धाक तोडे,मीना केदार, रूपा वली काळे,सोनाली पाटील,रुपाली महाले, संवेदीता जाधव,जालंदर कांडेकर,निवृत्ती साबळे ,सुनील पवार,राम शेळके,भाऊसाहेब तांबे,राजेंद्र पालवे,संकेत शिंदे,वैभव शिंदे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी केले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे साहेब,संचालक कृष्णाजी भगत साहेब,शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी अभिनंदन केले आहे.
