
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८८ वा दिवस* अहंकार नव्हे, तर आत्मत्याग हेच विश्वातील सर्वोच्च सत्य आहे. आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ होतो. आजच्या जगातले धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रुपाचे बनले आहेत. जगाला आज जर कशाची गरज असेल तर ती चारित्र्याचीच होय. निःस्वार्थ प्रेमाने ज्यांची जीवने प्रज्वलित झाली आहेत अशा लोकांची, सत्याचे अधिष्ठान ज्यांच्या ठायी आहे अशा लोकांची. सत्य, प्रेम, करुणा ज्यांच्या हृदयात असेल त्यांचा प्रत्येक शब्द वज्राप्रमाणे बलशाली व प्रभावी होईल. बुध्दीचातुर्यने यश मिळेलही मात्र विशाल ह्रदयाने शाश्वत विजय प्राप्त होईल. यावर विश्वास ठेवा. प्रेमाने जग जिंकता येते द्वेषाने नाही. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**★ भारतीय सौर ६ वैशाख शके १९४७*★ चैत्र वद्य/कृष्ण १३/१४★ शालिवाहन शके १९४७★ शिवशक ३५१★ विक्रम सम्वत् २०८२★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७ ★ शनिवार दि. २६ एप्रिल २०२५★ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी ★ १९२० प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा स्मृतिदिन.★ १९५६ भारतातील पहिल्या वृत्तपत्र कागदाच्या कारखान्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्घाटन केले.★ जागतिक बौध्दिक संपदा दिन.
