
के. के. वाघ महाविद्यालय नाशिक , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील एनएसएस कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक प्रा.मयुर उशीर यांची २५ व २६ एप्रिल २०२५ रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय एनएसएस संमेलनासाठी निवड झाली आहे. युवक कायदे व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय संमेलनात एनएसएसच्या बदलत्या स्वरूपाबाबत, माय भारत उपक्रम आणि विकसित भारतात एनएसएसची भूमिका या विषयांवर चर्चा होणार आहे.
ही निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि के. के. वाघ शिक्षण संस्थेसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत केलेल्या प्रा. मयुर उशीर यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची ही दखल आहे.
या निमित्ताने प्रा. मयुर उशीर यांनी आदरणीय कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर तसेच एनएसएस प्रादेशिक संचालक आदरणीय अजय शिंदे , एनएसएस संचालक डॉ. सदानंद भोसले, प्रा. रवींद्र अहिरे यांचे विशेष आभार मानले. तसेच, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री समीर वाघ, समन्वयक डॉ. विनायक सेवलीकर प्राचार्य डॉ. संभाजी पाटील यांचेही त्यांनी प्रोत्साहन व मार्गदर्शनासाठी आभार मानले.
विशेषतः, प्रा. मयुर उशीर हे चांदवडच्या धोंडांबे गावचे रहिवासी रोटरी क्लब ऑफ नाशिक व विवेकानंद केंद्र , नाशिक चे सक्रिय सदस्य आहेत. त्यांची ही निवड नाशिक शहरासाठीही अत्यंत अभिमानास्पद ठरत आहे.
राष्ट्रीय पातळीवरील या संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे प्रा. मयुर उशीर यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून, हे प्रेरणादायी यश निश्चितच युवा सेवकांसाठी मार्गदर्शक ठरेल.
