
सिन्नर ( प्रतिनिधी ) पहलगाम येथील दहशतवाद्यांनी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने जाहिर निषेध भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे.महामित्र म्हणाले की दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत २८ जण मृत्युमुखी पडले आहेत.पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्व सिन्नर वासियांच्या. वतीने जाहीर निषेध केलाजम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा , निष्पाप नागरिकांवर झालेला हा भ्याड हल्ला भ्याडपणाचा आणि अत्यंत निंदनीय आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करून केलेला भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय आणि वेदनादायक आहे.विजय मुठे म्हणाले कीहे घृणास्पद लक्ष्यित हल्ले मानवतेवर कलंक आहेत. , पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे., संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे. व या घटनेचा निषेध केला आहे. निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करून अनेक मौल्यवान जीव गमावणारा दहशतवादी हल्ला हा एक क्रूर कृत्य आहे जो विवेकाला हादरवून टाकतो,अशा या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील २८ जणांचा मृत्यू झाल्याबद्दल बळींना आदरांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.यावेळी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, डाॅ.राजेंद्र जाधव, दिलीप वारुंगसे प्रकाश माळी, मनोज माळी,गोपीनाथ वाजे,रमेश भाटजीरे, नामदेव कुटे,गणपत काळे,बापू चव्हाण, दत्ता जाधव, राजेंद्र देशमुख,प्रशांत देशमुख, प्रशांत शेवाळे,राजेंद्र निचळ
