
चापडगाव (प्रतिनिधी ) शेवगाव तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कवी गवाजी बळीद यांना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पक्षांसाठी मुठभर दाणा वाटीभर पाणी, एक विद्यार्थी एक , शालेय परसबाग , व्यसनमुक्ती प्रबोधन, पर्यावरण संवर्धन , जलसाक्षरता , एकल पालक सहकार्य, दिनविशेष सादरीकरण ,भाषिक काव्यकोडी ,विज्ञान काव्यकोडी निर्मिती आदि प्रबोधनात्मक कार्यक्रम, ,कला, क्रीडा सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन स्व पै किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि पै . नाना डोंगरे व्यायाम शाळा निमगाव वाघा ता नगर यांच्या वतीने शिवछत्रपती गुणवंत राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष पै नाना डोंगरे यांनी कळविले आहे. शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह , सन्मान पत्र ,फेटा असे पुरस्काराचे स्वरूप असून १९ फेब्रुवारी रोजी २०२६ रोजी शिवजयंती निमित्त आयोजित पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक तथा गीतकार महावीरसिंग चौहान यांच्या हस्ते व अॅड. भूषणराव बर्हाटे नोटरी पब्लिक व मा ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक सुपा आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत परिवार मंगल कार्यालय निमगाव वाघा ता नगर येथे प्रदान करण्यात येणार आहे .
या यशाबद्दल कवी शिक्षक गवाजी बळीद यांचे मा गटविकास अधिकारी आदरणीय सोनल शहा मॅडम , गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी डॉ शंकर गाडेकर शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोरे केंद्रप्रमुख बबनराव ढाकणे मुख्याध्यापक तुकाराम भगत सहकारी शिक्षक दादासाहेब चव्हाण बाबासाहेब हरदास रविंद्र घनवट कारभारी नाचन मंजुश्री खंडागळे – नाचन आदिसह चेअरमन कल्याणराव नेमाने सरपंच विठाताई नेमाने सर्व ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्यांसह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ पालक विद्यार्थी व सर्व स्तरातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे .
