
शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल असणाऱ्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा व सांस्कृतिक गुणांचा विकास करण्यासाठी शिक्षक परिश्रम करतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक वातावरण निर्माण झाले असून त्यांना विविध क्षेत्रात यश मिळाले आहे असे गौरवोद्गार उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामचंद्र बोडके यांनी काढले.ते
गोदावरी विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.उपशिक्षणाधिकारी बोडके यांनी हिंदी चादर उपक्रम, मराठी भाषा विकास व संवर्धन पंधरवडा,कॉपी मुक्त परीक्षा अभियान, गुणवत्ता विकास कार्यक्रम,भविष्याच्या वाटा, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिंगवे ता.निफाड येथील जागृती युवक मंडळ शिंगवे, संचलित गोदावरी माध्यमिक विद्यालयात वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव डेरले सर तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी जि.प. नाशिक रामचंद्र बोडके , जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी चे डेप्युटी मॅनेजर सुनील गांगुर्डे , प्रसिद्ध बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष भास्करराव दादा गीते, चिटणीस लक्ष्मणराव भागवत, सरचिटणीस गोपाळराव डेरले ,सदस्य भास्करराव डेरले,डॉ. दीपक कोरडे, बबनराव डेरले,शिंगवे तंटामुक्ती अध्यक्ष जगन राव पाटील डेरले, धोंडीराम आप्पा रायते, सरपंच सुशीला ताई पवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखिल डेरले आदी उपस्थित होते.
प्रथम सर्व मान्यवरांचे औक्षण करण्यात आले. गोदावरी गीत मंचने स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वडघुले यांनी
प्रास्ताविक व स्वागत केले.सुनील गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.
सुप्रसिद्ध बालसाहित्यिक राजेंद्र सोमवंशी विविध कविता ऐकवल्या व स्वच्छता, आरोग्य, सामाजिक जाणीव,स्वाभिमान तसेच आपल्या शाळेविषयी कृतज्ञता बाळगणे विद्यार्थ्यांनी सुसंस्कृत व्हावे आपल्या आई-वडिलांना परमेश्वर माणूस त्यांची सेवा करावी इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी आपल्या मनोगतातून दिली.

मीनाक्षी गोस्वामी यांनी अहवाल वाचन केले.नंदकुमार संगमनेरे व बाळकृष्ण शिंदे यांनी पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. . वंदना वडघुले यांनी सूत्रसंचालन केले. सामूहिक पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. अनिता देशमुख यांनी आभार मानले. संजय कोंटूरवार, स्मिता लबडे, रोशनी गोसावी, मोनाली दिघे,अपेक्षा वाबळे, संपत मत्सागर, भगवान पाटील, नारायण खरात, कुमार संकेत भडांगे, अर्पिता देसाई, अश्विनी डेरले यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
