
नांदगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदगावतर्फे यंदा भव्य आणि दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्री. नूतन कासलीवाल यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शौर्य आणि पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने यंदा विशेष कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत “शिवसोहळा” या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. राजमुद्रा, मुंबई निर्मित “महाराष्ट्राच्या शिवशौर्याचा धगधगता इतिहास – शिवसोहळा” हे भव्य नाटक प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे.
हा नाट्यप्रयोग बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता शिवसृष्टी, मालेगाव रोड, नांदगाव येथे रंगणार आहे. तमाम शिवप्रेमी माता-भगिनी, बंधू तसेच लहानग्यांनी सहकुटुंब उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास अनुभवावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून श्री. नूतन कासलीवाल (अध्यक्ष, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदगाव) कार्यरत आहेत.

शिवजयंती कार्यक्रमाची रूपरेषा
बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता आमदार श्री सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्फूर्ती नांदगाव येथे मूर्ती अभिषेक करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक नांदगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसफूर्ती येथून सायंकाळी पाच वाजता निघणार आहे.
तसेच
आमदार श्री सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या शुभ हस्ते शिवसृष्टी नांदगाव येथे महाआरती करण्यात येणार आहे.
तरी नांदगाव व पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदगाव 2026
