
सिन्नर ( प्रतिनिधी ) सिन्नर येथील मातोश्री चांडक कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्वरा गोरक्ष सोनवणे हिने रामानुजन नॅशनल मॅथ्स चॅलेंज – 2025 या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आरएनएमसी (RNMC) इंटरव्ह्यू टेस्ट (इयत्ता 9 वी, दिनांक 17 जानेवारी 2026) मध्ये 100% गुण मिळवत ऑल इंडिया रँक (AIR) 64 प्राप्त केला असून तालुका व जिल्ह्यातून निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल तिला रु. 500 चे बक्षीस, औद्योगिक मान्यता असलेले राष्ट्रीय स्तरावरील AICTSD प्रमाणपत्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेत सहभागी होण्याची संधी तसेच राष्ट्रीय गणित शिष्यवृत्तीची संधी मिळाली आहे. स्वराला सुनीता कर्डीले (मुख्याध्यापक), सुवर्णा सोनवणे (पर्यवेक्षक) तसेच प्रिया कुलकर्णी व आसावरी बर्वे यांचे मार्गदर्शन लाभले असून तिच्या या यशाबद्दल पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीराम क्षत्रिय यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
