नाशिक ( प्रतिनिधी ):- इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी दिले जाणारे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यावर्षीचा सर्वतीर्थ पुरस्कार अष्टपैलू साहित्यिक प्रा.डॉ.गिरीश पाटील आणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम ढिकले यांना जाहीर झाला आहे.
ज्ञानदूत पुरस्कार प्रा.राजेश्वर शेळके, ज्ञानसाधना पुरस्कार रामचंद्र शिंदे, कलारत्न पुरस्कार दिनेश चव्हाण, काव्यरत्न पुरस्कार प्राचार्य प्र.द.कुलकर्णी, अक्षरदूत पुरस्कार आरती डिंगोरे, दारणागौरव पुरस्कार रतन संचेती, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार डॉ.हनुमंत बांगर आणि डॉ.सुनीता बांगर, साहित्यसेवा पुरस्कार सुहास टिपरे यांना त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक कार्याबद्दल देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, ग्रंथमित्र बाळासाहेब फलटणे, ॲड.ज्ञानेश्वर गुळवे, दत्तात्रेय झनकर, रवींद्र पाटील, हिरामण शिंदे यांनी दिली. पुरस्कार वितरण येत्या रविवारी (२२) ग्रामसेवक भवन सभागृह, बाजीराव नगर, पत्रीपुलाजवळ, गंगोत्री गॅरेजमागे, तिडके कॉलनी, नाशिक येथे स.१० वा. पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. सर्व रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.