
नंदगाव (प्रतिनिधी) येथील देवीदास मोरे यांच्या कार्यालयात नुकतीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी नांदगाव अनिस ची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ठकसेन गोराणे आणि नाशिक जिल्हा महाराष्ट्र अनिसचे उपाध्यक्ष डॉक्टर सुंदर झळके होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे होते.

सर्वानुमते खालील प्रमाणे 2026 – 27 वर्षासाठी पुढील प्रमाणे नूतन कार्यकारणी निवडण्यात आली.
अध्यक्ष :- भगिरथ जेजूरकर उपाध्यक्ष :- देदीदास मोरे
उपाध्यक्ष:- सर्पमित्र प्रभाकर निकुंभ कार्याध्यक्ष :- प्रज्ञानंद दयानंद जाधव
प्रधान सचिव :- प्रा. सुरेश माधवराव नारायणे
बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह :- मंगेश अंबादास आहेर
विविध उपक्रम विभाग कार्यवाह :- प्रा. विक्रम दिनकर घुगे
वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाह :- प्रा. रवींद्र बबनराव सुरसे
प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग:- संजय विठ्ठल कांदळकर
अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका व विवेक विचार प्रकाशन :- मारुती भिकाजी जगधने व नाना सुरेश अहिरे
महिला प्रतिनिधी व कायदे विषयक व्यवस्थापन :- अँड. विद्या कसबे,
याप्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना समितीचे मार्गदर्शक व राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे आणि नाशिक जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके यांनी भ्रमणध्वनी द्वारे समितीस मार्गदर्शन केले आणि नवनिर्वाचित कार्यकारणीचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि सामाजिक विवेकी विचार रुजविण्यासाठी नवीन कार्यकारिणीने काम करावे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक मारुती जगधने यांनी केले तसेच यावेळी नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला.
