
सिन्नर प्रतिनिधी (सोमनाथ गिरी ):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय घोटी या केंद्राची एस.एस.सी.परीक्षेसाठीची केंद्र आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
जनता विद्यालय घोटी . केंद्र क्रमांक १२१५ असून दि. २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण ३८५ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. जनता विद्यालयात बैठक क्रमांक - डी शून्य ३९२९२ ते डी शून्य ३९६७६ पर्यंत अशी एकूण ३८५ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था सर्व विषयासाठी करण्यात आली आहे.या केंद्रात जनता विद्यालय घोटी , मुंढेगाव तसेच नित्यानंद इंग्लिश मेडिअम स्कुल घोटी या शाळा समाविष्ट आहे.
अशी माहिती जनता विद्यालय व उच्च माध्यमिक घोटीचे पर्यवेक्षक व केंद्रसंचालक हिरामण चौधरी यांनी दिली आहे .
परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी १० वाजता
परीक्षा केंद्रात हजर रहावे. सोबत फक्त लेखन साहित्य व पाणी बॉटल आणावे. परीक्षा केंद्रात कोणीही मोबाईल तसेच स्मार्ट वॉच आणू नये. दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज घोटीचे प्राचार्य नितीन भामरे,उपमुख्याध्यापक उल्हास पवार,केंद्र संचालक हिरामण चौधरी, उपकेंद्रसंचालक नामदेव सरगर,मुख्य लिपिक भाऊसाहेब रणशेवरे,वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे,अनिल गोवर्धने, वैशाली विधाते,संपत शेंगाळ यांनी केले आहे.
