
*गीताई वाघ कन्या विद्यालयात विद्यार्थीनींना शुभेच्छा निरोप समारंभ उत्साहात संपन्न…..
भाऊसाहेब नगर तालुका निफाड (नाशिक) येथील गीताई वाघ कन्या विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यीनींचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व स्नेहमय वातावरणात पार पडला. गिताई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या

या सदिच्छा कार्यक्रमासाठी यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल चे उपमुख्याध्यापक व सुप्रसिद्ध बालसाहित्यिक कवी श्री.राजेंद्र सोमवंशी व जेष्ठ पत्रकार श्री लक्ष्मण पडोळ सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कु.पूर्वा जाधव व कु.मालती कुमावत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक कु.श्रेया जगताप हिने केले.
आईच्या कष्टाची व बापाच्या स्वप्नाची पूर्ती करणे ही तुमची जबाबदारी असल्याचे कवी राजेंद्र सोमवंशी यांनी विद्यार्थीनींना आपल्या मनोगतातून व कवितेतून आवाहन केले यावेळी के. के. वाघ विद्याभवनचे प्राचार्य श्री दिवाकर शेजवळ समन्वयक श्री.यशवंत ढगे , गुरुकुल वसतीगृहाच्या प्रमुख मा.उषा बोरस्ते यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.कु.एंजल पगारे, भक्ती गोराडे, ईश्वरी वाघमारे, श्रद्धा फटांगडे, कु.अनुष्का झाल्टे,

कु.पल्लवी घोलप, कु.मयुरी थोरात, कु.काजल जाधव या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले ज्येष्ठ शिक्षक श्री. वसंत खैरनार, सौ. शैलजा घोटकर यांनी दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवुन शाळेच्या लौकिकात भर घालण्यासाठी सर्व विद्यार्थीनींनी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन करुन दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्व विद्यार्थीनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

