
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंदेवाडी (गीताकुंज) येथील विद्यार्थ्यांनी कृषी संशोधन केंद्र कुंदेवाडी निफाड येथे भेट दिली क्षेत्र भेट शिवार फेरी दरम्यान डॉ.भरत मालुंजकर यांनी विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रावर पिकावर कसे संशोधन करतात,गहू पीक कसे घेतले जाते,गव्हाचे विविध वाण,गव्हापासून बनणारे विविध पदार्थ कोणत्या गव्हापासून तयार होतात.यातील विविध वाणांच्या तुलनेत अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड केली जाते,तसेच येथील हवामान वेधशाळा याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या शिवारफेरी आयोजना साठी कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.भालचंद्र मस्के साहेब, गहू विशेषज्ञ, डॉ. निलेश मगर, गहूपैदासकार, प्रा. संजय चितोडकर, कृषी विद्यावेता यांचे सहकार्य लाभले. डॉ.भरत मालुंजकर,वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी विद्यार्थ्यांना सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये कृषी शिक्षणाविषयी इच्छा जागृत केली. कृषी संशोधन केंद्राचा परिसर बघून येथे चाललेले संशोधन बघून शिक्षक व विद्यार्थी भारावून गेले. शाळेचे शिक्षक यांनी संशोधन केंद्राच्या संशोधनाचे काम समजून घेतले आणि समाधान व्यक्त केले.

डॉ.मालूंजकर यांनी विद्यार्थ्यांना या वयात कृषी शिक्षणाचे महत्व समजावे, कृषी शास्त्रा कडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल वाढावा म्हणुन अशा भेटीचे सहलीचे आयोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्र,विविध कृषी प्रदर्शन विद्यार्थ्यांंना दाखवणे आणि त्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देणे गरजेचे आहे.
या सहशालेय उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे यांनी निवड करुन विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली,शेतीच्या माध्यमातून हरितक्रांती करून विकास साधता येतो,
हे प्रतिपादन डॉ.मालूंजकर यांनी केले.
या उपक्रमात शाळेचे सर्व विद्यार्थी व शाळेतील मुख्याध्यापक सौ. वैशाली शिंदे, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जयश्री लायरे मॅडम,श्रीमती वैशाली पाटील मॅडम, श्रीमती पूनम महाजन मॅडम उपस्थित होते. क्षेत्र भेट व शिवार फेरी निमित्ताने विधी भोजन म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली शिंदे व सर्व शिक्षकवृंद व पोषण आहार कार्यकर्त्या सौ.सरला बंडू पवार व मदतनीस श्रीमती अनिता संदीप पवार यांनी पावभाजी व सोनपापडी,चाॅकलेटची मेजवानी दिली.विद्यार्थ्यांनी या सहलीचा मनमुराद आनंद लुटला.या प्रसंगी इयत्ता चौथीचा गुणवंत विद्यार्थी कु.संयोग काशीद याचा वाढदिवस साजरा केला.
शालेय उपक्रमासाठी शिक्षणप्रेमी मा.श्री.वैकुंठ भाऊ पाटील यांनी व ग्रामस्थ,पालक यांनी विशेष सहकार्य केले.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंगेश भाऊ भुजबळ, उपाध्यक्ष श्री विलास काळे, शिक्षणप्रेमी श्री.अभय बलदोटा यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
गावाचे प्रथम नागरिक मा.श्री.विनोद भाऊ मोरे यांनी शाळेचे कौतुक केले.
श्रीमती वैशाली पाटील मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
