
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी :श्री सिन्नर दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने महाशिवरात्री उत्सव अत्यंत भक्तीभाव, उत्साह व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सिन्नर येथील प्राचीन ऐश्वर्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र गिरी होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सरचिटणीस वसंत गोसावी यांनी महाशिवरात्रीचे धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, भगवान शिवाची आराधना म्हणजे आत्मशुद्धी, संयम, साधना आणि समाजसंघटन यांचा संगम होय. महाशिवरात्री हा केवळ उपवास-पूजेचा दिवस नसून समाजाला एकत्र आणणारा, समता व सेवाभाव दृढ करणारा पवित्र पर्व आहे.
यावेळी शिवमहिम्न स्तोत्र, शिवस्तुती तसेच द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पठणासह मान्य पंचोपचार पूजा व शिवमानस पूजेचे भावपूर्ण सादरीकरण वसंत गोसावी व रतनपुरी गोसावी यांनी केले. “ओंकारेश्वर” सामुदायिक आरतीने मंदिर परिसर भक्तिमय झाला.

तालुकाभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भैरवनाथ गोसावी, भानुदासपुरी गोसावी, काशिनाथ गोसावी, रविंद्र गिरी, रतनपुरी गोसावी, ब्रह्मगिरी गोसावी, शरद गोसावी, राजेंद्र गोसावी, छगन गोसावी, भाऊसाहेब गोसावी, दौलत गोसावी, विठ्ठल बावा, संतोष गोसावी, अनिल गोसावी, भाऊगिरी गोसावी, शाम गोसावी, दिगंबर पुरी, दत्तात्रय गोसावी, पंडित गोसावी ,शरद गोसावी , सुरज गोसावी, रोहित गोसावी, वैष्णव गिरी, पार्थ गिरी, ऋषिकेश भारती, तसेच सौ. दिपाली गोसावी, सौ. अर्चना गोसावी, सौ. शोभा गोसावी, सौ.अनिता गोसावी , लिलावती गोसावी, स्वाती गिरी , योगिता गोसावी,तारा गोसावी , आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यानंतर सर्व भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. समाधीभुमी विकसन व महाप्रसाद व्यवस्थेसाठी भैरवनाथ गोसावी, संजयकुमार गोसावी, विजय गोसावी, यशोदाताई गोसावी, पंडित गोसावी, राजेश गोसावी, स्वप्नील गोसावी, मोनिका गोसावी, सुनिल गोसावी आदींनी देणगी देऊन सहकार्य केले.
दरम्यान बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष किरण जाधव, किरण भाऊ कोथमीरे, नगरसेवक अनिल सरवार, नगरसेविका आशाताई कर्पे, आर्यन जाधव यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. महाशिवरात्री उत्सवाच्या माध्यमातून श्री सिन्नर दशनाम गोसावी समाज संघटनेने समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि बंधुभावाचा प्रभावी संदेश दिला. सामुदायिक पूजा, आरती व महाप्रसाद या उपक्रमांमुळे समाजातील सर्व घटक एकत्र येऊन “एकीमध्ये शक्ती” हा संदेश अधोरेखित झाला.
या उपक्रमामुळे समाज संघटन अधिक बळकट झाले असून भविष्यातही धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य सुरू राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
