
रोहीले ( प्रतिनिधी ) संत सेवालाल सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री एस. जी.राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालय रोहिले येथे आज 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री जाधव मॅडम
या होत्या त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संत सेवालाल महाराज यांचे समाजासाठी योगदान समजावून सांगितले संत सेवालाल महाराज यांनी माणुसकीची सेवा आणि निसर्गाचे रक्षण हाच खरा धर्म ही शिकवण समाजाला दिल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस एन सय्यद
एस डी बच्छाव पी व्ही पाडवी आर् जी गोविल जे डी जाधव डी के जाधव
पी आर निकम यु के सरोवर विशाल काळे सौरभ बागुल अर्जुन चव्हाण विजय राठोड या सर्वांनी प्रयत्न केले विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद
व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी
मोलाचे योगदान दिले
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोनवणे बी एस.यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे व गुरुजनांचे ए.बी. कटारे यांनी आभार व्यक्त केले.
