नांदगाव,( प्रज्ञाशोध जाधव प्रतिनिधी)नांदगांव शहरातील नगरपालिका हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आहे वाचनालयाची इमारत पूर्णतः जीर्ण (पड़झड) झालेली असून बंद पड़लेली आहे. नांदगांव शहरातील तमाम सुज्ञ नागरीकांच्या मागणी नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे नूतनीकरण करुण वाचनालय सुरु करावे,त्या अनुशंगाने नांदगांव नगरपरिषदचे लोकनियुक्त प्रतिनिधी (नगराध्यक्ष /नगरसेवक / नगरसेविका यांच्या निदर्शनास आणून दिली. तशा आशयाचे निवेदन जगताप सर यांच्या मार्गदर्शनाख़ाली नगरसेविका सौ.राखी महावीर जाधव यांनी नांदगांव विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा.सुहास (अण्णा) कांदे यांना दिले सदर निवेदनावर नगरसेविका सौ. कल्पना वाल्मीक जगताप, नगरसेविका श्रीमती. विद्याताई अभिमान कसबे,नगरसेवक,श्री दीपक प्रमोद पांडव,नगरसेवक,श्री काका वनाजी सोळसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री सागर हिरे यांना ही अत्यंत महत्वपूर्ण बाब लक्षात आणून दिली.नांदगांव विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा.सुहास (अण्णा) कांदे यांनी लवकरात लवकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे इमारत बांधून डिजिटल स्वरूपाचे नूतनीकरण करण्यात येईल अशे आश्वासन दिले. सदर निवेदन देते वेळी श्री सागर हिरे (लोकनियुक्त नगराध्यक्ष), नगरसेविका सौ. राखीताई महावीर जाधव नगरसेविका सौ. कल्पना वाल्मीक जगताप, नगरसेविका श्रीमती. विद्याताई अभिमान कसबे, नगरसेवक श्री.दीपक प्रमोद पांडव,नगरसेवक श्री.काका वनाजी सोळसे,जगताप सर,(प्रबोधन मंच) मा. महावीर (नाना) जाधव (रिपाई शहरप्रमुख) आदि उपस्थित होते.