
सिन्नर ( प्रतिनिधी. ) येथील गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवरात्री उत्सवानिमित्त नाशिक येथील श्री गोंदेश्वर चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्ट तसेच लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने समता ब्लड बँकेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान हे पुण्य कर्म आहे हे लक्षात घेऊन रक्तदान करावे व आपले सामाजिक व नैतिक कर्तव्य पार पाडावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सीए राम डावरे,सचिव सुरेश गुंजाळ ,सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके , लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.देवेन पाठक यांनी केले आहे.
