
सिन्नर (प्रतिनिधी) येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक घेण्यात आली.यावेळी सिन्नर अंनिसची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.निरीक्षक म्हणून नाशिक जिल्हा महा. अंनिसचे उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष हरिभाऊ तांबे होते.सर्वानुमते खालील प्रमाणे नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली….
अध्यक्ष…राजेंद्र मिठे, उपाध्यक्ष…बापू चतुर, सुनील कुऱ्हे, कार्याध्यक्ष…सुकदेव वाघ, प्रधान सचिव…दीपक भालेराव, बुवाबाजी विरोधी संघर्ष विभाग…बस्तीराम कुंदे, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प..प्रमोद काकडे, कायदेविषयक व्यवस्थापन विभाग ॲड.शिवानी बोऱ्हाडे,मार्गदर्शक.. हरिभाऊ तांबे,दत्ता वायचळे याप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना समितीचे उपाध्यक्ष यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समाजातील अंधश्रद्धा,अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, संतांचा तसेच महापुरुषांचा विवेकी विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करते. त्यासाठी नवीन पदाधिकारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी हरिभाऊ तांबे,दत्ता वायचळे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.
