
लासलगाव ( प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मानसशास्त्र विभाग व मानसिक आरोग्य समितीच्या वतीने सामाजिक प्रतिबद्धता उपक्रमाअंतर्गत मानसिक आरोग्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांनी रॅलीला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबाबत रॅलीच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन केले. सुमारे 50 विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभागी होऊन विविध घोषवाक्ये देत, मानसिक आरोग्य सुचनाफलक दाखवत महाविद्यालय ते बसस्टँड पर्यंत रॅली च्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती केली. या उपक्रमाचे आगार प्रमुख सविता काळे यांनी विशेष कौतुक केले. नागरिकांचा देखील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानसशास्त्र विभागातील प्रा.किशोर अंकुळनेकर, प्रा.सर्जेराव दरेकर, प्रा.राजेंद्र कडाळे, प्रा.संदीप शिंदे, प्रा.सोनाली पवार, प्रा.निकिता चव्हाण व मानसशास्त्र विभागातील विद्यार्थांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या रॅलीच्या आयोजनासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
