
लासलगाव ( प्रतिनिधी ) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी निर्भय कन्या अभियान कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. याप्रसंगी डॉ.भाग्यश्री सोनवणे यांनी ‘महिलांचे आरोग्य व आहार’ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तर ॲड. पूणम रायते यांनी ‘महिलांचे कायदे’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात योग शिक्षिका मोनिका जोशी यांनी विद्यार्थीनींना लाठीकाठी चे प्रशिक्षण देऊन विद्यार्थिनी स्वतःचे संरक्षण कशा पद्धतीने करू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे यांनी निर्भय कन्या अभियान हे
महाविद्यालयांमार्फत मुलींना सक्षम बनवण्याचे एक साधन आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किशोर अंनकुळणेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.मिलिंद साळुंके यांनी करून दिला. तर प्रा.स्वप्निल जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.मिलिंद साळुंके यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
