
तळोशी येथे ह भ प रवि महाराज गुंजाळ यांच्या संकल्पनेतून वैष्णव वारकरी शिक्षण संस्था व राजनंदिनी गोशाळा यांचा भूमिपूजन सोहळा आचार्य रामकृष्णदासजी लहवितकर, योगी केशव महाराज १००८ श्री श्री ओम भारतीजी महाराज,यांच्या हस्ते संपन्न झाला आईची व गाईची सेवा येणाऱ्या काळात होणे गरजेचे झाले असुन येणाऱ्या पिढीवर त्याचा योग्य परिणाम होईल खऱ्या अर्थाने तेव्हाच धर्म टिकेल असे प्रतिपादन आचार्य रामकृष्णदासजी लहवितकर यांनी केले तर धर्माला जोपर्यंत राजाश्रय प्राप्त होत नाही तोपर्यंत धर्म कार्यविस्तार होण्यास अडचण होते म्हणुन हि वारकरी शिक्षण संस्था व गोशाळा यांच्या माध्यमातून नवी पिढी घडणार असल्याचे माजी आमदार सौ निर्मलाताई गावित यांनी सांगितले
या कार्यक्रमास माजी आमदार सौ निर्मलाताई गावित,भाजपा संघटनमंत्री रवीजी अनासपुरे,जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव सर, रमेशजी गावित,नाशिक महापालिकेच्या नगरसेविका सौ ऊषाताई बेंडकुळे, हिरामण बेंडकुळे, शिवसेना उबाठा नेते निवृत्तीपाटील जाधव,जेष्ठ नेते जनार्दन माळी,वामन खोसकर, भाजपा नेते महेश श्रीश्रीमाळ,भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सीमाताई झोले,भाजपा मंडल अध्यक्ष अण्णा पवार,भाजपा नेते उत्तमराव भोसले, माजी उपसभापती अर्जुन पाटील जाधव,कैलास चौधरी,रविंद्र गव्हाणे, योगेश क्षीरसागर, बाळासाहेब लंगडे, नारायण वळकंदे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा नेते भास्करराव गुंजाळ यांनी तर आभार रवि महाराज गुंजाळ यांनी मानले
