
नाशिक जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात समूहगीत गायन( लोकसंगीत) स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयाच्या संघाला प्रदान करताना युवा शाहीर पृथ्वीराज माळी, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे समवेत उपस्थित मान्यवर आणि मुख्याध्यापक श्री रामदास वाजे,मार्गदर्शक शिक्षक श्री ज्ञानेश्वर कर्पे.

सायखेडा-( प्रतिनिधी. ):येथील मविप्रच्या जनता इंग्लिंश स्कूल विद्यालयाने नाशिक येथे झालेल्या मविप्र जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात समूहगीत गायन( लोकसंगीत) या स्पर्धा प्रकारात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केंद्र स्तर आणि जिल्हा स्तरावर केले जाते. विद्यालयाच्या गीतमंचाने आदिशक्ती ‘अंबाबाईचा उदो अंबाबाईचा’ हे गीत सादर केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुप्रसिद्ध युवा शाहीर पृथ्वीराज माळी, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती देवराम मोगल,चिटणीस दिलीप दळवी, नाशिक ग्रामीण संचालक रमेश पिंगळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर ढोके आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या यशाबद्दल मविप्र निफाड तालुका संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष श्री विजय कारे ,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष श्री कमलाकांतचार्य महाराज,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितिन गावले, प्राचार्य श्री रामदास वाजे, उपमुख्याध्यापिका अलका अहिरे, पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार आदींसह सर्व सदस्य आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
गीताची निवड व संगीत संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख व संगीत शिक्षक श्री.ज्ञानेश्वर कर्पे यांनी केले. तर सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर गीतमंचामध्ये कु आरोही पुराणिक, कु संचिता कांडेकर , कु अवनी कुटे,कु क्षितीज कटारे तसेच गीतमंचच्या सर्व विद्यार्थ्यांनी वाद्यवृंदासह सहभाग घेतला. विद्यार्थांना श्री अवधूत आवारे,श्री संपत कांडेकर, श्री अशोक टर्ले, श्रीमती प्रतिक्षा शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
