
नांदगाव( प्रतिनिधी ): भारतीय जनता पक्षाच्या वतीने पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त नांदगाव मंडळात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध बूथस्तरावर कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

बूथ क्र. 118, 116 व 117 (सावरगाव) येथे मारुती मंदिर, ग्रामपंचायत समोर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंडळ अध्यक्ष संजय सानप, मंडळ उपाध्यक्ष दत्तूभाऊ शेलार तसेच एस.सी. मोर्चा तालुका अध्यक्ष धनराज मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास कार्यकर्ते उपस्थित होते.
बूथ क्र. 83237 (न्यायडोंगरी) येथे बाजारपेठ, ग्रामपंचायत समोर अभिवादन करण्यात आले. या वेळी मंडळ अध्यक्ष संजय सानप, मंडळ उपाध्यक्ष शांताराम जाधव व एस.सी. मोर्चा तालुका अध्यक्ष धनराज मंडलिक उपस्थित होते. अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

तसेच बूथ क्र. 164 येथे हुतात्मा चौक, रेस्ट हाऊस समोर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष संजय सानप उपस्थित होते. कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने छाजेड यांच्या पेट्रोल पंपावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष संजू भाऊ सानप, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तराजजी छाजेड, जिल्हा सरचिटणीस संजू भाऊ निकम, एस.सी. मोर्चा तालुका अध्यक्ष धनराज मंडलिक, बूथ प्रमुख सनी शेलार आदी उपस्थित होते
याप्रसंगी नगरसेवक दत्तराज छाजेड यांनी पं. मिलिंद दयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगत व्यक्त करून त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
या सर्व कार्यक्रमांतून पं.दिनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

