
सिन्नर (प्रतिनिधी) सहकार महर्षी दिवंगत खासदार उत्तमराव ढिकले यांच्या जयंतीनिमित्त स्व.उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने तसेच नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल तारवाला नगर येथे करण्यात आले.या स्पर्धेत सिन्नर येथील चांडक कन्या विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. दिशाली शिवप्रसाद बलदवा हिने प्रथम क्रमांक पटकावला.विद्यालयाच्या
मुख्याध्यापिका सुनीता कर्डिले तसेच क्रीडाशिक्षिका स्नेहल आरखडे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल दिशालीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
