
ओझर:( वार्ताहर)येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते होऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सोपान वाटपाडे यांनी संस्था स्थापनेत व शाखा विस्तार करण्यात कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांचा सिंहाचा वाटा होता.’बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ऊक्तीप्रमाणे त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच संस्थेचा विकास होऊन भरभराट झाली असल्याचे सांगितले. फलक रेखाटन कलाशिक्षिका सविता पवार मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.
