
नांदगाव:( प्रतिनिधी ). नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर व बालमंदिर, नांदगाव येथे ‘बाल महोत्सव’ आणि ‘रंगभरण स्पर्धेचा’ बक्षीस वितरण व समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या या महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे स्वरूप व मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री. विजय अण्णा परदेशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मा. श्री.प्रकाश शिंदे, आणि संकुल प्रमुख मा. श्री. संजीव धामणे सर, माता पालक संघ उपाध्यक्षा सौ. अश्विनी कुमावत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गीतमंचच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन म्हणून केली त्यांना हार्मोनियम साथ श्री. श्रीपाद मुळे सरांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापिका सौ. सुनीता जाधव मॅडम यांनी केले. त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची तसेच बालमहोत्सव बद्दल माहिती दिली. अध्यक्ष मा. श्री. विजय अण्णा परदेशी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. श्री. दिपक नारळे सर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला.

मनोगत व्यक्त करताना संकुल प्रमुख श्री. संजीव धामणे सर यांनी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे कौतुक केले. अभ्यासासोबतच अशा कलात्मक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असा सूर मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
श्री. प्रकाश शिंदे यांनी देखील मुलांना शुभेच्छा दिल्या.शाळेचे अधिक्षक मा. भैयासाहेब चव्हाण यांनी बाल महोत्सवाचे नियोजन व आयोजन याबद्दल पालकांना माहिती दिली.
बक्षीस वितरण मध्ये नृत्यसंमेलन उत्कृष्ट, आनंद मेळावा उत्कृष्ट सहभाग तसेच
रंगभरण स्पर्धेतील आमची शाळा तसेच मोठ्या प्रमाणावर इतर शाळांनी सहभाग नोंदवला त्यात विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी पालकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आभार व सूत्रसंचालन
संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. आशा सोनवणे ( शेवरे ) मॅडम यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी सौ. खरोटे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
