
ओझर: ( वार्ताहर )निफाड तालुक्यात मिशन ऍनिमिया मुक्त भारत अंतर्गत अरुणोदय सिकल सेल अभियान अंतर्गत विंचूर येथील प्रसिद्ध exotic fruits processing कंपनीचे श्री पुरुषोत्तम बाहेती जनरल मॅनेजर, मार्केटिंगचे सेल्स मॅनेजर दीपक शिंदे यांच्याकडून सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान नियोजनासाठी निफाड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला सिकल सेल टेस्टिंगचे 1000 किटस सीएसआर फंडातून देण्यात आले. त्यामुळे निफाड तालुक्यातील सुमारे 50000 लाभार्थीची सिकल सेल सोलूबलिंटी टेस्टिंग होणार आहे याचा सर्व सामान्य नागरिकांना निश्चित फायदा होईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजित कोशिरे म्हणाले. यावेळी तालुक्यातील डॉ निलेश चव्हाण, आरोग्य सहायक सानप नाना, संतोष नवले, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक उपस्थित होते. यानिमित्त exotic fruits प्रोसेसिंग कंपनीचे उपस्थितानी आभार मानले.
