
नाशिक ( प्रतिनिधी ) वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत इ.१० वीच्या विद्यार्थिनींचा आशीर्वाद समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी शाळेचे चेअरमन मा.श्री.रमेश महाशब्दे यांनी आपल्या भाषणात आशीर्वादाचा अर्थ समजावून सांगितला.
दि एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत इ.१० वीच्या विद्यार्थिनींचा आशीर्वाद समारंभ साजरा करण्यात आला

.यावेळी शालेय समितीचे चेअरमन मा.श्री.रमेश महाशब्दे साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले.उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सरांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकातून प्रत्येक विद्यार्थिनींनी सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शालेय समितीचे चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब प्रमुख पाहुणे तथा संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम यांनी केला तसेच विविध स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थिनींनी शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शालेय समितीचे चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब यांनी मनोगतातून इ.१० वीच्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक वेगळे वळण लागते.नवी दिशा मिळते.यश नक्की मिळेल याची खात्री बाळगा.यावेळी किती गुण मिळतील,मी उत्तीर्ण होईन की नाही याचा विचार मनात आणू नका.तसेच नकारात्मक विचार करण्यात वेळ वाया न घालवता आशीर्वादाची सकारात्मक ऊर्जा घेऊन परीक्षेला सामोरे जावे असे सांगून परिक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर यांनी यावेळी विषयाचे सखोल वाचन,आकलन,चिंतन,मनन व त्यांचा व्यवहारातील उपयोग यामुळे जीवन समृध्द होण्यास आणि व्यक्तिमत्व विकसित होण्यास मदत होते. आपल्याला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास पाहिजे आहे असे सांगून उज्ज्वल भविष्यासाठी व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी यांनी यावेळी जबाबदारीचे , जाणिवेचे,अध्यापनाचे व नव्या संवेदनशील जाणिवांचे आयुष्य सुरु झाले आहे आता संकल्पांनी चेहरा बदलला,तो साकार करणे, त्यासाठी कसोशीने धडपडणे आणि समाजामध्ये वावरतांना प्रामाणिकपणे गुण आत्मसात करता आले पाहिजे,असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
इ.१० वीच्या विद्यार्थिनींनी शाळेसाठी सतरंजी भेट म्हणून दिली तसेच परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्याचेही वाटप विद्यार्थिनींना करण्यात आले.

यावेळी शाळेच्या अधिक्षिका सौ.मिना वाळुंजे ,डी. डी. बिटको बॉईज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे , पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे,उपशिक्षिका सौ.मेघना देशपांडे , उपशिक्षक श्री.महेंद्र जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
पाहुण्यांचा परिचय जेष्ठ शिक्षिका सौ.भारती चंद्रात्रे यांनी तर आभारप्रदर्शन गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. कैलास बागुल सर यांनी केले. सुत्रसंचालन कु.प्राची गोसावी व कु.प्रज्ञा ठोके हिने केले.फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशजी वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी ,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे यांच्या मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी , उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे ,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे ,सौ.विदया भानोसे सौ.मेघना देशपांडे , श्री.महेंद्र जगताप,सौ.रूपाली जोशी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
