
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या रोडू अण्णा गोविंदराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय जळगाव निं येथे निर्भय कन्या अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव मा.महेंद्र रोडू अण्णा पाटील हे होते. या समवेत संस्थेच्या अध्यक्षा कासुताई रोडू अण्णा पाटील,समन्वयक निंबाजी शिंदे, प्राचार्य श्री.सद्दाम अली अन्सारी , सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी प्रा.शीतल गायकवाड मॅडम अध्यक्ष म्हणून होत्या .आणि निमगाव आरोग्य केंद्राच्या गतप्रवर्तक सौ.प्रतिभा बच्छाव आणि जळगाव नि उपकेंद्राचे आरोग्य सेविका सुमन बागुल हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यांच्या प्रतिमेचे सरस्वती पूजन करण्यात आले. ‘.यावेळी प्रा. अमोल अहिरे,प्रा. सुदय बोरसे ,प्रा.योगेश ठोके ,प्रा. शारिक सर,एन.एस.एस.प्रमुख निसार सर, वानखेडे सर ,आर के काका उपस्थित होते.यावेळी खूप चांगले मार्गदर्शन आरोग्य सेविका सुमन बागुल यांनी केले .यावेळी बागुल मॅडम यांनी उत्तम आहाराचे किशोर वयातील मुलींमध्ये महत्त्व सांगितले तसेच निर्भय कन्या बनण्यासाठी संस्कार आणि आरोग्य यांचे महत्व बच्छाव ताईंनी सांगितले .

शहराच्या मनाने गावातील मुलींचे आरोग्य चांगले दिसते असे सांगून कौतुक सुधा केले. यावेळी ऋतुजा कांबळे आणि धनश्री दुकळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्याबरोबर अध्यक्षा. शितल गायकवाड मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत देवरे यांनी केले .आणि कार्यक्रमांचे आभार प्रा.दीपक बोरसे यांनी केले.
