
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी / दिनांक-११-०२-२०२६ रोजी ईस्लापूर ता.किनवट येथे धम्मा देवी यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेल्या लेझीम स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायवाडीच्या संत सेवालाल महाराज लेझीम पथकाने प्राथमिक गटातून सर्वोत्तम सादरीकरण करून पाचव्या क्रमांकाचे ७००१ रुपयांचे रोख बक्षीस
पटकावून पोटा केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याबद्दल स्वतः उपस्थित राहून सन्माननीय गटशिक्षणाधिकारी केशवजी मेकाले साहेब,कन्या बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील सरसमबीटचे माजी शिक्षण विस्ताराधिकारी श्री.पद्माकर कुलकर्णी , सरसम बीटचे कार्यरत शिक्षण विस्तार अधिकारी पंडितराव तळेगावकर ,

पोटा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री. संजय जाणते , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शामरावजी हरी आडे, ग्रामविकास अधिकारी श्री.आनंद कदम , गावच्या सरपंच कांताबाई बर्डे, उपसरपंच श्री.मधुकरराव राठोड तसेच गावचे कारभारी, पोलीस पाटील, नायक तसेच
ज्ञान, शिस्त आणि संस्कारांची उत्तम जोड बसवत नव्याने आपल्या कार्याचा ठसा सबंध शिक्षण वर्तूळात उमटविणारे वायवाडी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रसिद्ध साहित्यिक श्री शंकर नामदेव गच्चे सहशिक्षक श्री.दत्ता मुसांडे, श्री.चंद्रकांत जान्ते ,संपूर्ण लेझीम पथकाचे दिग्दर्शन व संचलन करणाऱ्या श्रीमती प्रियंका आंबुरे मॅडम सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन तुमचे हे यश तुमच्या कठोर मेहनतीचे आणि चिकाटीचे फलित आहे. भविष्यातही आपण यशाच्या शिखरावर पोहोचाल हिच सदिच्छा
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पूनच्छ मनःपूर्वक अभिनंदन!
