
नाशिक ( प्रतिनिधी )स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे.चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेमार्फत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये इयत्ता सातवी अ ब क ड विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लोकशाही मूल्ये व मतदानाचे महत्त्व याबाबत समाजात सकारात्मक संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी मॅडम श्रीयुत झोटिंग सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
