
नाशिक (प्रतिनिधी)स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, मोरवाडी, सिडको यांनी सामाजिक वनीकरण विभाग नाशिक मध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत विविध नवोपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये
1)पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व संवर्धन,
2)प्लास्टिक मुक्त परिसर,
3) पाणी बचत,
4)जैवविविधता संवर्धन,
5)एक पेड मां के नाम,
6)हरित कुंभ,
7)शाडू माती गणपती कार्यशाळा,
8) आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी,
9) वन्यजीव सप्ताह,
10)जैविक कचरा व्यवस्थापन
11) नागपंचमीनिमित्त सर्प जनजागृती व्याख्यान
तसेच विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविल्या बद्दल विद्यालयाला मा. श्री. गजेंद्र हिरे

वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग नाशिक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाच्या मा. मुख्याध्यापिका उज्वला माळी, पर्यवेक्षक किशोर झोटिंग, राष्ट्रीय हरित सेनेचे शालेय सदस्य दिलीप पानपाटील, जितेंद्र गायकवाड, दामू गावित . प्रिया शेवाळे, प्रिया पवार तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
