
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७९ वा दिवस
केवळ वैदिक धर्मानेच चार पुरुषार्थाची मांडणी केली. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषांथांच्या आधारे सामाजिक नितीनियमांची रचना केली. हिंदुस्थानात कुमारीलभट्टांनी पुन्हा कर्ममार्गाचा प्रसार केला. आद्य शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांनी वैदिक धर्माची पुन्हा दृढपणे प्रतिष्ठापना केली. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषांथांची समतोल रचना त्यांनी समाजात निर्माण केली. अशा रीतीने राष्ट्राला नवचैतन्याच्या मार्गावर आणून ठेवली पण तीस कोटींचे हे राष्ट्र जागे व्हायला वेळच लागणार. तीस कोटींचे पुनरुत्थान ही काय एका दिवसात वा एका रात्रीत होणारी गोष्ट आहे काय?
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २३ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १२ फेब्रुवारी २०२६
★ १७४२ मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ यांचा जन्मदिन.
★ १७९४ पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचा स्मृतीदिन
★ १८०९ अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्मदिन.
★ १८०९ उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्मदिन.
