
निर्भय कन्या अभियानात मार्गदर्शन करताना डॉ. रेखा मोरे व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर
निर्भय कन्या अभियान: काकासाहेबनगर महाविद्यालय
समानता ही केवळ तोंडी घोषणा न राहता ती आपल्या वर्तनात आणि दैनंदिन जगण्यात उतरायला हवी. लहान वयातच मुली आणि मुलांमध्ये करण्यात येणारे भेदभाव, मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष, आर्थिक हक्कांपासून त्यांना वंचित ठेवणे आणि रूढी-परंपरांच्या नावाखाली त्यांच्यावर बंधने घालणे. यामुळे समाजात महिलांचे स्थान दुय्यम राहते. मानवी व्यवहारांच्या सर्वच पातळींवर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान संधी हवी. तरच स्त्री पुरुष समानता झाली. असे म्हणता येईल. असे प्रतिपादन डॉ. रेखा मोरे यांनी केले
के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय काकासाहेबनगर येथे विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने निर्भय कन्या अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. रेखा मोरे ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर बोलत होत्या. समाजरुपी रथ विकासाकडे दौडवायचा असेल तर पुरुषरुपी चाकाबरोबर स्त्रीरूपी चाकालाही विकासाची तेवढीच चालना मिळणे गरजेचे आहे. असे सांगत पंडिता रमाबाई आणि सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी कर्तृत्व विद्यार्थिंनी समोर ठेवले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अॅड. वैशाली गांगुर्डे यांनी ‘महिलांचे कायदे’ या विषयावर व्याख्यान दिले. आजची महिला ही घरातही आणि घराबाहेरही सुरक्षित नाही. तिने तिच्यावर होणारा अन्याय मुकाट सहन करायचा नाही. महिलांच्या बाजूने अनेक कायदे आहे. हेच महिलांना माहीती नाही. असे सांगून त्यांनी त्या कायद्यासदर्भात माहीती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल गवारे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. निलेश आहेर यांनी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रतिभा बाहेकर, सूत्रसंचालन वैष्णवी कुशारे, आभार डॉ. भावना पौळ यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. मिलींद पवार, डॉ. त्र्यंबक बाबळे, डॉ. अरुण ठोके, प्रा. शीतल जगताप, प्रा. वैशाली शिंदे, प्रा. मुक्ता मोरे, प्रा. अर्चना ताकाटे, प्रा. काजल वाघ, प्रा. पल्लवी कदम, प्रा. जयश्री कापडी, प्रा. प्रतिक पाटील, प्रा. बाळकृष्ण फडे, श्री. अनिल राजोळे, श्री. ज्ञानेश्वर गवळी आदी प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थिंनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
