
नांदगाव ( प्रतिनिधी ) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर नांदगाव शाळेत बाल महोत्सव चा दुसरा दिवस दि. 10/2/2026 वार मंगळवार रोजी आनंदात पार पडला. कार्यक्रमासाठी मा.सिद्धेश महेश खरोटे,मा. श्री. बापू खैरनार, श्री. गुलाब पाटील सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा सोहळा पार पडला. सर्वप्रथम प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापिका सौ. सुनिता बाळासाहेब जाधव मॅडम यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचा विषय म्हणजे आजी आजोबांसोबत किंवा आईबाबासोबत मुलांचा डान्सचे आयोजन करण्यात आले त्यात शाळेचे अधिक्षक मा भैयासाहेब चव्हाण, सौ. नंदाताई चव्हाण यांनी आपल्या नातीसमवेत सुंदर नृत्य सादर केले. तसेच शाळेतील शिक्षक श्री बुरकुल सर, बुरुकुल मॅडम यांनी आई व त्यांच्या कन्येसोबत समवेत डान्स सादर केला, माता पालक संघच्या सदस्या नी बाईपण भारी देवा या गीतावर डान्स सादर केला तसेच उपाध्यक्ष सौ. कुमावत मॅडम यांनी देखील आपल्या पाल्यासोबत सुंदर राम आयेंगे या गीतावर डान्स सादर केला.

याशिवाय आद्या गुप्ता व तिच्या आईने आईचे भावस्पर्शी गीत सादर केले. रिक्षाचालक वाल्मिक कोळेकर यांनी कुटुंबसमवेत नृत्य सादर केले. अशा बऱ्याच पालकांनी सहभाग घेऊन आजचा कार्यक्रम बहारदार, रंगतदार केला आजचा कार्यक्रमाचे नियोजन श्री. बुरुकुल सर, कुलकर्णी मॅडम यांनी केलेले असून सूत्रसंचालन जोशी मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच बालमंदिर विभाग या सर्वांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम छान पैकी पार पडला.
