
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ पाटिल गायकर यांजकडुन
ऐन थंडीच्या कालावधीत ठाणे जिल्हयासह नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात हलाखीचे जीवन जगणार्या आदिवासी बांधवानां थेट वस्तीवर जात गरम व उबदार ब्लँकेंटचे वाटप नुकतोच अंधेरी, ईगतपुरी येथील सामाजिक कार्यकर्त्याकडुन करणेत आले आहे.
मुंबई येथील अंधेरी मित्र मंडळ यांच्या सौजन्याने इगतपुरी व ठाणे जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील त्रिंगलवाडी, पत्र्याची वाडी, तळ्याची वाडी, आवळखेड, चांगवाडी, बिबडेवाडी, कत्रू वंगण, चिचले खैरे, जामुंडे, काळुस्तेची वाडी, विगावची वाडी, बळवंतवाडी, वाकडपाडा कडूची वाडी, काचाळे, मेट येळ्याची अशा आदिवासी वाड्यापाड्यात आदिवासी बांधव, आया-बहिणींना पाच हजार पेक्षा जास्त ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
सदर सेवा कार्यासाठी मुंबई येथील अंधेरी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पिचा जैन, जैन कॉन्फरन्स चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पारसजी मोदी,भाजपा नेते महेशजी श्रीश्रीमाळ, संघपती प्रकाशजी टाटिया,प्रकाशजी कोठारी, प्रकाशजी लोढा, विनोदजी डागा,विजयजी ओसवाल,अजितजी बाफना, सज्जनजी शर्मा,राजेशजी मेहता, गौरवजी गायकवाड, दयानाना आव्हाड, मदनजी छाजेड, संदीप रावत, मयूर पारख, ऋषभ बाफना, स्पर्श श्रीश्रीमाल आदी यावेळी उपस्थित होते.
गरिबास अल्प आधार – श्रीश्रीमाळ
आजही अतिदुर्गम व डोंगराळ भागात आदिवासी बांधव हलाखीचे जीवन जगत आहे. या बांधवानां जगण्याचं बळ देण्यासाठी अल्प मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम आहे असे महेश श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.
