
यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नाशिक या शाळेत नुकतेच स्काऊट-गाईड शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता बाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आले.यावेळी उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी, पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे,ग.कौ सदस्या सौ.भारती चंद्रात्रे जेष्ठ शिक्षिका सौ.मिनाक्षी दोंड ,सौ.विद्या भानोसे उपस्थित होत्या.

शिबिराच्या माध्यमातून नेतृत्व गुण, स्वयंशिस्त, सामाजिक भान व राष्ट्रप्रेम जागृत होते असे मत मुख्याध्यापिका सौ. सुनिता बाजपेयी यांनी व्यक्त केले.शिबिराचे नियोजन गाईड विभाग प्रमुख सौ.लता शिंदे यांनी केले.
शिबिराला इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनी सहभाग नोंदवला. शिबिरची सुरूवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर स्काऊट गाईड प्रार्थना घेऊन विविध समूह गीते विद्यार्थिनींनी सादर केली.

त्यानंतर विद्यार्थिनींनी नाटिका सादर केली व शेकोटी प्रार्थना व गीत गात आनंद साजरा करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्काऊट गाईड शिबिराच्या यशस्वितेसाठी सहप्रमुख सौ.वैशाली जाधव,सौ.सीमा कोळी सौ.रंजना खैरनार ,श्री.विजय सरोदे, श्री.गणपत मुकणे , श्री.महेंद्र जगताप , श्रीमती अर्चना गायकवाड, सौ.चेतना टोपले ,सौ.प्रतिभा महाजन ,सौ.दिपाली ठाकूर,सौ.मेघना देशपांडे ,सौ.रूपाली जोशी , कलाशिक्षिका श्रीमती सायली मुळे यांनी परिश्रम घेतले.

शाळा कर्मचारी श्री.दत्ता गायकवाड, श्री.अनिल गायकर श्री.सूरज काळे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय सरोदे यांनी तर आभार शिबीर प्रमुख सौ.लता शिंदे यांनी मानले.
