
सिन्नर ( प्रतिनिधी)९ फेब्रुवारी २०२६ भारतातील पहिली कामगार संघटना चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास व नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी कामगार चळवळीतील रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
राष्ट्पिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतील नारायण मेघाजी लोखंडे यांनी संपूर्ण भारतातील कामगारांसाठी त्यांनी स्वतःला झुकून दिल कापड गिरणीच्या कामगारांची परिस्थिती व दहशतीच्या वातावरणा सुधारण्यासाठी त्यांना मालकशाहीच्या विरुद्ध व कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यावेळी कामगारांना १३ १४ तास काम करावा लागत त्यांची शोषण केलं जात होतं त्यामुळे त्यांनी साप्ताहिक सुट्टी मागणी केली व त्यासाठी त्यांनी कामगारांना संघटित करण्याचे काम केले तसेच नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली आणि नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते.

देवाभाऊ सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की नारायण मेघाजी लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुटीसाठी लढा दिला आणि १० जून १८९० पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली जी आजपर्यंत चालू आहे.अशा रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवा सातभाई यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार विकास मिठे यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे एस टी कामगार विभागचे अध्यक्ष देवाभाऊ सांगळे संतोष दुबें, शिवा सातभाई, विकास मिठे ,निलेश लोंढे, संतोष खैरे, निलेश जाधव ,तुषार पवार, मंगेश पिंपळे, पोपट लोंढे, आकाश धोंगडे, शाम डांगे ,योगेश मोरे आदि उपस्थित होते
