
साकोरे (प्रतिनिधी ) पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय साकोरे येथे इयत्ता दहावी विद्यार्थी यांच्या निरोप समारोप कार्यक्रम वेळी मार्गदर्शन करताना विलास बोरसे यांनी आजच्या युगात विद्यार्थी सुशिक्षित व संस्कारीत असणं अवश्य आहे. तसेच नोकरीं मिळवण्यासाठी धङपङ करण्यापेक्षा नोकरी देणारे बना यापेक्षा मोठे यश नाही. कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून पवन कुटे यांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थी यांना परीक्षा पँङ वाटप करण्याचा संंक्लप केला व वाटप करण्यात आले. इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्याथी यांनी क्वी विद्यार्थी यांना शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. पूजा दरडे, गौरव पगारे, सुमित चव्हाण, शर्वरी बोरसे, प्राजक्ता सोनवने यांनी विद्यालयातील आठवणी व्यक्त करतांना भाऊक झाले शिक्षक आज ही आई- वङिल यांची भूमिका पार पाडत आहे. आमच्या साठी भौतिक, शैक्षणिक व इतर सुविधा संस्थेने व विद्यालयने आम्हाला कमी पङू दिल्या नाहीत मत व्यक्त केले. वर्गशिक्षक बोरसे व्ही पी व मनोहर बोरसे सर यांनी तसेच मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी परीक्षा पूर्व तयारी बाबत अवगत केले कार्यक्रम चे सुञसंचलन शर्वरी बोरसे व भूमिका बोरसे यांनी तर आभार प्राजक्ता सोनवणे यांनी केले. विद्यालया साठी घङ्याळ भेट देऊन मिष्ठान्न फराळ खाऊन सांगता करण्यात आली.
