
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या कार्यकारिणी निवडीप्रसंगी (डावीकडून)पत्रकार सुरेश शेळके,संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार,नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम,माजी तालुकाध्यक्ष भरत पारख,पदाधिकारी सचिन बैरागी,सिताराम पिंगळे,हेमराज वाघ,शंकर विसपुते,भरत देवरे आदी
नांदगाव, (प्रतिनिधी ) ता. 9 :नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक सकाळचे बातमीदार व BK 9 मराठी न्यूज चॅनल चे संपादक बाबासाहेब कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे विद्यमान तालुकाध्यक्ष भरत पारख यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी शिवनेरी शासकीय सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला संस्थेचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार संजीव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली,संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार यांच्या उपस्थितीत व विद्यमान तालुकाध्यक्ष भरत पारख यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली.
बैठकीच्या प्रारंभी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षक संघटनेचे नेते दिवंगत राजेंद्र पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर तालुकाध्यक्षपदासाठी पत्रकार सचिन बैरागी यांनी बाबासाहेब कदम यांच्या नावाची सूचना मांडली,तर संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार यांनी त्यास अनुमोदन दिले.उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने या निवडीस मंजुरी दिल्याने बाबासाहेब कदम यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणीतील उर्वरित पदांची निवड नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुढील बैठकीत करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार यांनी सांगितले.तसेच या महिन्यात सभासद नूतनीकरणाची प्रक्रिया राबवून सभासदांना विमा संरक्षण लाभ देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या निवडीबद्दल आमदार सुहास अण्णा कांदे,ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, समृद्धी सहकारी बँकेच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे,माजी सभापती तेज कवडे आदींनी बाबासाहेब कदम यांचे अभिनंदन केले.
या निवडी प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार संजीव निकम,संजीव धामणे,जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके,विजय चोपडा,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार माजी तालुकध्यक्ष भरत पारख,पदधिकारी संचिन बैरागी सिताराम पिंगळे,हेमराज वाघ,शँकर विसपुते,भरत देवरे या सह पत्रकार संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिक्रिया
“नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार.सभासद व पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा आदर राखून,सर्वांना विश्वासात घेऊन संघटनेचे कामकाज पारदर्शकपणे केले जाईल.”
— बाबासाहेब कदम,नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष
