
“भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,बांगड्या सोन्याच्या रमाईनी दिल्या काढुनी”

नांदगाव (प्रतिनिधी,प्रज्ञानंद जाधव )नांदगाव शहरातील समाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर (नाना)जाधव हे दरवर्षीप्रमाणे नांदगाव शहरात त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती अतिशय उत्सवात,सांस्कृतिक माध्यमातून त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग हे प्रबोधन स्वरूपाने सादर करून जनते पर्यंत त्यांचे विचार घेऊन साजरी करत असतात.त्यामुळे नांदगाव तालुक्यातील बहुजन समाजातील जनसमुदाय त्यांना प्रचंड प्रतिसाद देत असतात माता रमाई घरोघरी पोहचविण्याचे काम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर जाधव व त्यांचे सहकारी अतिशय परिश्रम घेउन हे कार्य दरवर्षी पार पाडत असतात यंदाच्या वर्षाला देखील जयंती निमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र गाजत असलेले सत्यपाल महाराजांचे शिष्य,यांचे तुफान विनोदी, वस्तूसह, प्रसिद्ध प्रबोधनकार इंजिनीयर पवन महाराज दवंडे यांचा भव्य प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते

.यावेळी त्यागमुर्ती माता रमाई जयंती उत्सवाची सुरवात सर्व प्रथम समृद्धी बँकेच्या चेयरमन, समाजसेविका सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले तसेच महापुरुषांना देखील पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली सोबत आलेले नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे,उपनगराध्यक्ष राजेश शिंदे यांच्या सह सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी देखील पुष्प अर्पण करून वदंन केले होते.

यावेळी सौ अंजुमताई कांदे यांनी उपस्थित सर्व बहुजन जनसमुदाय यांना काबाड, कष्ट,त्याग,संघर्ष,मातृत्व,प्रेम, यावर रमाईच्या,जिजाऊंच्या, सावित्रीबाई,अहिल्यादेवी, संस्काराचे आठवण करून दिली प्रत्येक महिला ही माते समान बहिणी प्रमाणेचं असते,आपले संस्कार आपल्याला घडवतात या थोर मातांच्या आठवणींना उजाळा देत मालेगावातील घटनेच्या आठवणीने तीन वर्षाच्या चिमुकलीच्या आईने माझा हाथ हातात घेतला आणि एकच आक्रोश करत ढासाळली गेली होती अंगाला काटा येतो आशा घटनांनी जनतेचे प्रबोधनातून मन कसे परिवर्तन केले जाईल यांची नक्कीच दखल घेतली पाहिजे प्रत्येकाने या समाज प्रबोधनातून समाज घडवीण्याचा प्रत्यन करूया आशा शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रबोदनकार इंजि.दवंडे यांनी मालेगावातील घटनेचा विषय घेऊन कांदेताईंनी गांभीर्याने दखल घेतल्याने सौ अंजुमताई कांदे यांचे कौतुक केले.माझ्या माता बघीनींनो आपल्या देशात प्रत्येक गोष्ट मोजण्याचे यंत्र आहे उदाहरणार्थ बी.पी.,शुगर, थर्मामिटर,परंतु वाईट नजरने बघणाऱ्यांच असं कुठलंच यंत्राचे साधन नाही म्हणुन आपल्या मुलांना ए.बी.सि.डी नंतर शिकवा अगोदर रस्त्याने जाण्याऱ्या महिलेला ताई आई बहिणी म्हणुन हाक मारायचे पहिले शिकवा संस्कार घडवा मुलांवर तेव्हाच आपला देश पुढे जाईल.छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६५ किल्ले जिंकले पण लिंबू मिरची कधी बांधली नाही अंधश्रद्धा बाहेर काढा आणि मानवतावादी विचार डोक्यात घ्या मी आणि माझ्या पत्नीने देहदान केला मेडिकल कॉलेजच्या मुलांना कारण ही जनता माझी औक्सिजन आहे आणि समाजासाठी आमची ही तळमळ आहे या प्रबोधनातून बोलत पुढे म्हणाले आपल्या मुलांच्या हातात बंदूक तलवारच दिली गेली पण पुस्तक मात्र कोणीच वाचू दिले नाही या पुरोगामी महाराष्ट्रात विचार शुद्ध हवे तेव्हाच बुद्ध दिसतील संविधान बदलणाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले असे ऐकण्यात येते परंतु जो पर्यत सुर्य चंद्र आहे तो पर्यंत बदलणे शक्य नाही २६ जानेवारी रोजी घटनेच्या जोरावर नाशिकला माधवी जाधव या भीमाच्या वाघीनीने डरकाळी फोडली कशाच्या जोरावर शिक्षणाच्या आणि संविधानाच्या आणि याचं घटनेने बहुजणांना बळकट देखील केले आहे हे लक्षात घ्या.या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे ग्रुपच्या वतीने स्वागत सत्कार करून अतिशय मोठ्या उत्साहाने महाअन्नदान या कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने पार पडला होता सदर कार्यक्रम चालू असतांना महा अन्नदान देखील चालूच होते. हा रमाई जयंती सोहळ्या निमित्त कार्यक्रम नांदगाव शहरातील ज.ता.का. खंडेलवाल जैन धर्म शाळा या प्रांगणात सायंकाळी माता रमाई यांच्या आठवणींना उजाळा देत पार पडला होता.

यावेळी सूत्रसंचालन बौद्धाचार्य आनंद पवार यांनी बघितले तर प्रस्थावना माजी उपनगराध्यक्ष/नगरसेवक नितीन जाधव यांनी केले होते तर कार्यक्रमाचे आभार महावीर जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत गरुड, गौतम काकळीज,जफर शेख,किरण पवार,दीपक मोरे,सोहेल रंगरेज,पिंटू लोखंडे,ऋषी जाधव,शशी जाधव,सोमनाथ चौधरी, सलमान पठाण,चेतन इघे, संदीप इघे,संदीप महिरे, अर्जुन पैठणकर यांच्यासह अनेक मित्र परिवारांनी केले होते. नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुजन जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाअन्नदानाचा जयंती निमित्ताने आनंद घेतला होता.
