
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी : क्रांतिकारक उमाजी नाईक व लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त पाटोळे शाळेत स्पर्धा व बक्षीस वितरण उत्साहात संपन्न झाले. क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चरित्र लेखन स्पर्धा घेण्यात आली होती तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस शाळेच्या वतीने देण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव, इतिहासाची आवड तसेच महापुरुषांच्या कार्याची ओळख निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी दोन्ही स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली लेखनकौशल्ये व विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी होते. यावेळी कैलास पवार, मिना सोनवणे, प्रतिभा पवार, सुनिता खताळे तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
प्रास्ताविक व मार्गदर्शनात महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. बक्षीस वितरणामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून भविष्यात अशा स्पर्धांमध्ये अधिक जोमाने सहभागी होण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
