
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी ):- घोटी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज घोटी ता - इगतपुरी जि.नाशिक या विद्यालयात एच.एस.सी.परीक्षेसाठीची केंद्र आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी . केंद्र क्रमांक ३२१ असून दि.१० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी एकूण ५८७ विद्यार्थी प्रविष्ट आहे. जनता विद्यालयात बैठक क्रमांक - S -११८६९७ ते S १६२९५५ पर्यंत अशी एकूण ४५० विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था सर्व विषयासाठी करण्यात आली आहे.या केंद्रात जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी ,
न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहुर्ली ,
आदर्श कन्या विद्यालय घोटी , उच्च माध्यमिक विद्यालय गोंदे तसेच वाघेरे येथील उच्च माध्यमिक विद्यालय या शाळा समाविष्ट आहे. तसेच उपकेंद्र आदर्श कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी या उपकेंद्रात आसन क्रमांक S -१६२९५६ ते १७१४४७ S पर्यन्त अशी १३७ विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केलेली आहे
अशी माहिती जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटीचे उपमुख्याध्यापक व केंद्र क्रमांक ० ३२१ चे केंद्रसंचालक उल्हास पवार यांनी दिली आहे .
संबंधित संलग्न शाळेतील परीक्षार्थींचा समावेश या केंद्रात आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी १० वाजता
परीक्षा केंद्रात हजर रहावे. सोबत फक्त लेखन साहित्य व पाणी बॉटल आणावे. सोबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज घोटीचे प्राचार्य नितीन भामरे,केंद्र संचालक उल्हास पवार यांनी केले आहे.
