
सिन्नर( प्रतिनिधी) मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय, सिन्नर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित शुभेच्छा समारंभ शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. सुनिता कर्डिले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थिनींना अभ्यास, शिस्त व आत्मविश्वासाचे महत्त्व सांगत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अॅड. श्रीराम क्षत्रिय, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे तसेच पालक-शिक्षक संघाचे सभासद उपस्थित होते. अध्यक्ष अॅड. श्रीराम क्षत्रिय यांनी सातत्य, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोनातून यश साध्य होते, असे मार्गदर्शन केले. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे यांनी पालक व शिक्षकांच्या अपेक्षा प्रेरणा मानून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमात विद्यार्थिनी भैरवी कमानकर, अक्षदा मुंडे, स्नेहल कोटकर, दिशाली बलदवा, प्रगती लोंढे व स्नेहा भाले यांनी मनोगतातून शाळेतील आठवणी व कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक प्रतिनिधी उत्तम भोये, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे व ज्येष्ठ शिक्षिका नीलिमा दुसाने यांनी परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी गुणवंत विद्यार्थिनी भैरवी कमानकर, दिशाली बलदवा व सोनाली ढाकरगे तसेच गुणवंत शिक्षिका प्रिया कुलकर्णी व प्रतिभा वाढवणे यांचा पालक-शिक्षक संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रेशमा कडतन यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
