
आज संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज, शेगाव यांचा प्रकटदिन शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात व देश-विदेशात साजरा होत आहे. या वर्षीच्या प्रकटदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे "श्रीं"च्याप्रकटदिनाची तारीख व तिथी ही एकाच दिवशी आली आहे. हा योगायोग काही वर्षांनंतर जुळून आला आहे. माघ वद्य सप्तमी शके १८०० दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ रोजी श्री गजानन महाराज प्रकट झाले. काही वर्षानंतर यावर्षी ही तिथी व तारीख एकच आली आहे. त्यामुळे या प्रकटदिनाला भक्तांकडून विशेष महत्त्व दिले जात आहे.
गण गण गणात बोते’, चा अर्थ –
‘शेगावचे संत गजानन महाराज
हे नेहमी मधून-मधून
‘गण गण गणात बोते’, असा मंत्र म्हणत असत.
एका शिष्याने महाराजांना
त्याचा अर्थ विचारला.
गजानन महाराज म्हणाले,
‘‘पहिला ‘गण’ म्हणजे
जीव किंवा जीवात्मा,
दुसरा ‘गण’ शब्द म्हणजे
शिव किंवा शिवात्मा आणि
तिसरा शब्द ‘गणात’
म्हणजे ‘हृदयात’.
‘बोते’ म्हणजे पहा, बघा.
‘गण गण गणात बोते’, याचा अर्थ
‘हे जीवा, स्वतःच्या हृदयात शिवाला,
परमेश्वराला बघ.
अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय..
*● गण गण गणात बोते II *गण गण गणात बोते II ●*
