
सिन्नर (प्रतिनिधी)०७ फेब्रुवारी २०२६ त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की

आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीमधील अनेक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये रमाबाईनी भाग घेतला डाँ.आंबेडकरांच्या चळवळीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या बहुजना व दलित समाजातील लोक रमाबाई आई साहेब आणि डाँ. आंबेडकर यांना बाबासाहेब म्हणून संबोधतात,रमाबाई तीन ते चार किमी अंतरावर जाऊन शेण आणत असे. शेणाच्या गोवऱ्या तयार करुन विकत असे. जवळपासच्या परिसरातील स्ञिया म्हणत की बॅरिस्टरची पत्नी असुनही तिने आपल्या डोक्यावर गाईचे शेण घेतले आहे.त्यावर रमाबाई म्हणायच्या,घरकाम करण्यात कायलाज.माता रमाई ह्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या त्यामुळे बाबासाहेबांना आपले ध्येय पुर्ण करता आले.माता रमाई यांचा मृत्यू २७ मे १९३५ रोजी झाला.
अशा या महान त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन…

या कार्यक्रमाचे सुञसंचलन समाधान लाड यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार विशाल वाघ यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्य क्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, समाधान लाड विशाल वाघ योगेश मोरे शाम डांगे वैभव भदाणे चेतन शिंदे शिवम शिरसागर बाळा पगारे किरण माळी रोहित मुठे प्रकाश गुंजाळ सुनिल गुरुकुले आदि.उपस्थित होते.
