
जळगाव नेऊर (प्रतिनिधी)…जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदे येथे इयत्ता बारावीचे परीक्षा केंद्र (केंद्र क्रमांक ०२१५) असून परीक्षा मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. केंद्र संचालक बी. के. ढेपले यांनी आसन व्यवस्था जाहीर केली असुन इंग्रजी विषयासाठी एकूण ५७४ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. सर्व पेपरसाठी परीक्षार्थी क्रमांक S024402 ते S159593 यांची व्यवस्था जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदे शाळेत करण्यात आलेली आहे. या केंद्रात पाटोदा, जळगाव नेऊर, मुखेड , अंगणगाव ,पुरणगाव,अनकवाडे या विद्यालयांचा समावेश आहे.
