
सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींना सुचित करण्यात येते की,महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेना, उत्तर महाराष्ट्र विभाग, नाशिक यांच्यावतीने शनिवार, दि. ०७ फेब्रुवारी २०२६ दुपारी २:०० वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय कार्यालय (SSC Board) विभागीय शिक्षण मंडळाशी सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसंदर्भात मंडळाने अधिकृत पत्र ही निर्गमित केले आहे.
या सभेत इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा, मंडळाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या समस्या यावर थेट चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या शिक्षक / शिक्षकेतर बांधवांच्या काही समस्या, तक्रारी किंवा प्रश्न असतील, त्यांनी आपली लेखी माहिती आजच महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेना, नाशिक महानगर सरचिटणीस श्री. विनोद हिरे सर (मोबाईल : +91 90752 50088) यांच्याकडे पाठवावी.
या महत्त्वपूर्ण सहविचार सभेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
आपला
श्री.संजय चव्हाण
विभागीय अध्यक्ष
व
श्री विनोद हिरे सर,
सरचिटणीस,नासिक महानगर
महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेना
