

*माता रमाई यांना अभिवादन*
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७४ वा दिवस
जीवनात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि परावलंबनासारखे दारिद्र्य नाही. सतत रडणारी व्यक्ती दुबळी आणि परावलंबी बनत जाते, तर लढणारी व्यक्ती सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असते. तर रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभुती येते. आयुष्यभर लढायची हिंमत ठेवा.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास १८ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६
★ १२७४ महानुभाव पंथाचे संस्थापक श्री. चक्रधर स्वामी यांची पुण्यतिथी
★ १८९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्मदिन.
